मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या विश्वासदर्शक ठराव जिंकला. २८७ आमदारांपैकी १६४ मते शिंदे सरकार मिळाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने बहुमत चाचणी जिंकली. भाजपचे ज्येष्ठ आमदार माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी शिंदे सरकारच्या बहुमताचा प्रस्ताव विधानसभेत मांडला. सरकारच्या विरोधात ९९ जणांची मतदान केले. दरम्यान, विधानसभेच्या बहुमत चाचणीत आज २० आमदार गैरहजर होते.
सपाचे आबू आझमी आणि रइस शेख हे बहुमत चाचणीच्या वेळी तटस्थ राहिले. तर एमआयएमचे फारूख अन्वर हे सदस्य तटस्थ राहिले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुरुंगात असल्याने ते बहुमत चाचणीला उपस्थित नव्हते. दरम्यान, सोमवारी सकाळी ११ वाजता सुरु झालेल्या बहुमत चाचणीच्या अधिवेशनाला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह किमान चार आमदार अनुपस्थितीत होते. त्यामुळे तेही बहुमत चाचणीला मुकले.