सोलापूर इलेक्ट्रिक डीलर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.त्या सभेमध्ये शैलेश बच्चुवार यांची अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाल्याचे प्रशांत बडवे यांनी जाहीर करून शैलेश बच्चूवार यांचा सत्कार केला.दीप प्रज्वलन व गणेश पूजनाने सभेची सुरुवात झाली.त्यानंतर माजी अध्यक्ष अनिल कोठारी यांनी सर्वांचे स्वागत केले संस्थेचे सचिव जॉय छाबरिया यांनी अहवाल वाचन केले. माझ्यावर आपण जो विश्वास टाकला तो निश्चितपणे मी सार्थ करेन असोसिएशनच्या वाढीसाठी आणि व्यापारांच्या कल्याणासाठी मी निश्चितपणे काम करेन अशी ग्वाही नूतन अध्यक्ष शैलेश बच्चुवार यांनी दिली.
याप्रसंगी सभासद हितेश कांकरिया गोपाल झंवर यांनी आपले विचार व्यक्त केले. संस्थेचे सभासद सुनील पेंडसे यांची सोलापूर जनता सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष पदी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर च्या कार्याध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल आणि संस्थेच्या नवीन सभासदांचा सत्कार नूतन अध्यक्ष शैलेश बच्चूवार यांच्या हस्ते करण्यात आला.
या सभेस ज्येष्ठ संचालक पुरुषोत्तम बागडी, संजय सेठीया,विनोद सेठिया,आशिष कोठारी,सुरेंद्र जोशी,खुशाल देढीया उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन संजीव मुंदडा यांनी केले आणि आभार प्रदर्शन निलेश गर्जे यांनी केले