येस न्युज नेटवर्क : भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. आज कंपन्यांनी तेलाच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. यापूर्वी 21 मे रोजी केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झाले आहे. दरम्यान, सरकारनं पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनावरील निर्यात शुल्कात वाढ केली आहे. याचा तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल ते जाणून घ्या.
तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
केंद्र सरकारनं पेट्रोल, डिझेल आणि एटीएफच्या निर्यातीवरील उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. सरकारनं पेट्रोलच्या निर्यातीवरील उत्पादन शुल्कात 5 रुपये आणि डिझेलवर 12 रुपये प्रति लिटरनं वाढ केली आहे. याशिवाय एटीएफ निर्यातीवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात प्रति लिटर 6 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मात्र, याचा परिणाम घरगुती पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर होणार नाही.