उत्तर सोलापूर (तालुका प्रतिनिधी) :- सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षपदी नामदेव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून शुक्रवारी (दि.1) त्यांनी पदभार स्विकारला.
यापूर्वीचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांची नियंत्रण कक्षात बदली झाली असून जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे रिडर म्हणून कार्यरत असलेले नामदेव शिंदे यांची सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे बदलीने नियुक्ती झाली आहे. दरम्यान गेली दोन महिन्यांपासून सत्यसाई कार्तिक यांची परिविक्षाधीन कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. शुक्रवारी शिंदे यांनी पदभार स्विकारला. मुळचे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील पिंपळदरी या गावचे रहिवासी असलेल्या शिंदे यांना शिंदे यांना पोलीस दलातील कामाचा 17 वर्षांचा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी जिल्ह्यातील नागपूर शहर, सोलापूर गुन्हे शाखा, वेळापूर, अकलूज, नातेपुते, मंगळवेढा, कोल्हापूर, जयसिंगपूर, मुंबई शहर गुन्हे शाखा, बारामती (शहर) याठिकाणी काम केले आहे.
उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर या दोन्ही तालुक्यासाठी असलेले सोलापूर तालुका पोलीस ठाण्याअंतर्गत असलेली गावे मोहोळ, सोलापूर शहर उत्तर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट या चार विधानसभा मतदारसंघात विभागली असल्यामुळे हॅास्ट पोलीस स्टेशन म्हणून या पोलीस ठाण्याची ओळख आहे. पत्रकारांशी पोलताना नुतन पोलीस निरीक्षक शिंदे म्हणाले की, लोकप्रतिनिधी व सामान्य जनता यांचा समन्वय साधून,सर्वांना विश्वासात घेऊन आपण काम करणार असून सद् रक्षणाय खल निग्रहणाय, या पोलीस खात्याच्या ब्रीद वाक्याला साजेल अशीच आपली कामगिरी असेल. पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आपण कटीबद्द आहोत.