सोलापूर – माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे कृषी क्षेत्रात मोठे योगदान आहे. उतत्म नोकरी, मध्यम व्यापार व कनिष्ठ शेती हे जरी म्हण असली उत्तम शेती हाच मोठा पर्याय आहे. असे मत सिईओ दिलीप स्वामी यांनी व्यक्त केले.
कृषी दिना निमित्त माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे जन्मदिना निमित्त आयोजित कार्यक्रमाच्या बोलत होते. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, आत्मा चे संचालक दशरथ तांबाळे, डाळींब संशोधन केंद्रांचे डाॅ. अमृतसागर, आत्मा चे सहसंचालक मदन मुकणे, जिल्हा कृषी अधिकारी कुंभार , प्रमुख उपस्थित होते.
भविष्यातील शेती समोरील आव्हानांना सामोरे जावे लागणार असल्याचे सांगून शेतकरी हा जगाचा पोशींदा आहे. शेती आहे तर भाकरी आहे. असे सांगून सिईओ दिलीप स्वामी म्हणाले, शेतीचे उत्पादन वाढविणेचे महत्वाचे काम माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी केले. त्यांचे शेती क्षेत्रातील योगदान कोणी विसरू शकणार नाही. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा करणेचा निर्णय घेतला.
मी पुसद उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.स्वत नाईक यांची शेती मी पाहिली आहे. मुख्यमंत्री पदावर राहिलेली व्यक्ती पदावर असताना न नसताना देखील शेतीत रममाण व्हायची. त्यांना मातीची ओढ होती म्हणून त्यांनी कृषी क्षेत्रात मोठे काम केले.
शेतकरी यांची मुले कलेक्टर झाली पाहिजे
…………………………
शेतकरी यांची मुले कलेक्टर झाली पाहिजे. कारखानदार झाली पाहिजे हे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे स्वप्न होते. त्या साठी त्यांनी प्रयत्न केले. आता परिस्थिती बदलत आहेत. शेतकरी यांचे मुले कारखानदार झाली. जिल्हाधिकारी झाली आहेत. वसंतराव नाईक यांचे स्वप्न साकार होत आहे. कृषी क्षेत्रातील अर्थ पुरवठा लक्षण होणे साठी त्यांनी दिलेले येगदान महत्वपुर्ण आहे.
या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे म्हणाले, कृषी क्षेत्राला बळकटी देणेच काम वसंतराव नाईक यांनी केले. त्यांचे शेती विषयक विचार व त्या दृष्टीने केलेली कृती महत्वपुर्ण आहे. आत्मा चे संचालक दशरथ तांबाळे, डाळींब संशोधन केंद्रांचे डाॅ. अमृतसागर, आत्मा चे सहसंचालक मदन मुकणे, यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी शेतकरी बांधवांचा बीयाणे व वृक्ष देऊन त्यांचा गैर. करणेत आला. विस्तार अधिकारी सचिन चव्हाण यांनी स्वागत केले. जिल्हा कृषी अधिकारी कुंभार यांनी आभार मानले.