आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालया तर्फे महेश लॉन्स, सम्राट चौक सोलापूर येथे दिनांक 21 जून 2022 रोजी सकाळी 7 वा. आरोग्य योग साधना शिबिर संपन्न झाले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वस्थवृत्त व योग विभागाचे प्रमुख डॉ. अमोल वेल्हाळ यांनी केले
त्यांनी संस्थेबद्दलची, योगशास्त्राची माहिती व योगाचे सद्यकालीन महत्त्व विशद केले. या शिबिरासाठी प्रमुख अतिथी म्हणून सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक व गटनेते आनंद चंदनशिवे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेठ सखाराम नेमचंद जैन औषधालय ट्रस्ट, सोलापूर चे अध्यक्ष अरविंदजी दोशी उपस्थित होते. या योग साधना शिबिरामध्ये योग प्रशिक्षक धनंजय सूर्यवंशी यांनी योगशास्त्रा विषयी माहिती व योगासनांचे प्रात्यक्षिक घेतले, सूक्ष्म व्यायामापासून सुरुवात करून विविध आसने, प्राणायाम तसेच शवासन याविषयी मार्गदर्शन करून उपस्थितांकडून सराव करून घेतला. या शिबिरासाठी संस्थेच्या विश्वस्त प्रियदर्शनी जडेरिया, महाविद्यालयाच्या प्राचार्या वीणा जावळे, उपप्राचार्य डॉ. शांतिनाथ बागेवाडी, प्रशासकीय अधिकारी अनुप दोशी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी, शहरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिराचे सूत्रसंचालन डॉ गायत्री देशपांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. रेवणसिद्ध उस्तुरगे यांनी केले. शिबिराचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.