येस न्युज नेटवर्क : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरी राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात आज विरोधी पक्षांची बैठक झाली. बैठकीनंतर विरोधकांनी उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. जयराम रमेश, सुधींद्र कुलकर्णी, दीपंकर भट्टाचार्य, डी राजा, तिरुची शिवा, प्रफुल्ल पटेल, येचुरी, एनके प्रेमचंद्रन, मनोज झा, मल्लिकार्जुन खर्गे, रणदीप सुरजेवाला, हसनैन मसूदी या बैठकीला उपस्थित होते. अभिषेक बॅनर्जी आणि राम गोपाल यादव यांनीही बैठकीला हजेरी लावली.
या बैठकीला ओवेसी यांच्या पक्षाचे खासदार इम्तियाज जलीलही उपस्थित होते. मागील बैठकीत AIMIM ला बोलावण्यात आले नव्हते. खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, गेल्या वेळी बोलावले नव्हते म्हणून ते आले नाहीत. बैठकीनंतर काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, आम्ही एकमताने यशवंत सिन्हा हेच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांचे उमेदवार असतील असा निर्णय घेतला आहे.