येस न्युज मराठी नेटवर्क : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पंढरपूर मुख्य मंदिरातील मूर्ती वज्रलेप संदर्भात कारवाई करण्यात यावी असे निवेदन 18 जून रोजी मुख्यमंत्री कार्यालय येथे ईमेलद्वारे पाठवले होते. परंतू काहीही कारवाई करण्यात आली नाही. रुक्मिणी मातेच्या मूर्तीला पायाला दुरुस्ती करावी लागेल असे मंदिर समिती कडून जाहीर करण्यात आले होते. या अगोदर 2020 साली लेप दिला होता त्यावेळी 8 वर्ष काहीही होणार नाही असे स्पष्ट केले होते. पण दोन वर्षात लेप निघाला आहे. त्याचं कारण वेगळं दिल जात आहे. सध्या जो लेप मूर्तीला दिला आहे तो फक्त दोन ते चार वर्ष राहील असे स्पष्ट केले आहे. एवढ्या कमी कालावधीचे का केले आहे. पूर्वी व आत्ता केलेला लेप त्या संबंधीचे मूर्ती वज्रलेप करताना केलेला करार मंदिर समिती पंढरपूर यांनी जाहीर करावा. त्या करारा नुसार मूर्ती वज्रलेपचा (आयुष्य) कालावधी, मंदिर समितीने घातलेले नियम व अटी पूर्णपणे तपासून घेऊन ज्यांच्या बरोबर करार केला त्या संबंधितांवर , पूर्वी केलेला लेप करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा नोंद करून कारवाई करण्यात यावी.
तसेच मूर्ती वज्रलेप या कारणासाठी भाविकांच्या दर्शनावर, नित्यनेमावर अन्याय होऊ नये असे निवेदन अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे कडून जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांना देण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे, जिल्ह्याध्यक्ष ज्योतीराम चांगभले, जिल्हा सचिव मोहन शेळके, बळीराम जांभळे, गणेश वारे, आदी पदाधिकारी उपस्थित होते. कारवाई करण्यात आली नाही तर आंदोलन केले जाणार आहे असे स्पष्ट केले.
