येस न्युज नेटवर्क : विधान परिषदेच्या वारीत विजयाचा गुलाल कोण उधळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. याच दरम्यान भाजपा नेते व खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे. कोणत्याही राजकीय नेत्याचं थेट नाव न घेता त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. काळ आला होता भाऊ किंवा भाईवर पण मुख्यमंत्रिपद वाचविण्यासाठी बळी जाणार मिशीवाल्या मावळ्याचा” असं सूचक ट्वीट बोंडे यांनी केलं आहे. बोंडे यांनी केलेल्या या ट्वीटनंतर मिशीवाला मावळा कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे.