सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिर येथे पंतप्रधान आवास योजनेच्या घटक क्रमांक 3 ची माहिती शहरातील नागरिकांना होण्याकरिता दोन दिवसीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन महापालिकेचे आयुक्त पि.शिवशंकर यांच्या शुभहस्ते तर अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे,अग्रणी बँक व्यवस्थापक श्री प्रशांत नाशिककर, नगर अभियंता संदीप कारंजे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.सोलापूर शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत एकूण ०७ ठिकाणी प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये मजरेवाडी येथे आर. एस. एम डेव्हलपर्स मार्फत २४६४ घरकुलाचे काम चालू आहे.
दहीटणे येथील राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण संस्था मार्फत १२०० घरकुलांचे काम चालू आहे. तसेच अक्कलकोट रोड येथील एस. व्ही. स्मार्ट सिटी यांचे मार्फत २८८ घरकुलांचे काम चालू आहे. तसेच महा हौसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मार्फत मजरेवाडी येथे ३७१० घरकुलांचे काम चालू आहे. उर्वरित सलगर वस्ती व अंत्रोळीकर नगर येथे काम प्रगतीपथावर आहे.
सोलापुरातील पत्रकार करिता पत्रकार भवन येथे २३८ घरकुलांचे काम चालू आहे. याठिकाणी आर्थिकदृष्ट्या अल्प उत्पन्न असणारे घटक EWS घटकातील लोकाकरिता व ज्यांचे नावे मिळकत नाही अशा करिता परवडणारी घरे उपलब्ध आहेत याचा लाभ अर्जदारांनी घ्यावे. याकरिता केंद्र व राज्य शासनामार्फत एकूण २.५ लाखाचे अनुदान दिले जाते. याबाबत घटक क्र ३ मध्ये ऑनलाईन अर्ज सादर केलेले लाभार्थ्यांचा मेळावा हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये भरविण्यात आला असून शहरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त पि.शिवशंकर यांनी केले.प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण 14377 घरकुलांची मंजुरी शासनाने दिलेली आहे. त्यापैकी बांधकाम परवानगीसाठी 6628 व्यक्तीने दाखल केले आहेत. त्याचबरोबर पूर्ण असलेले घरकुलांची संख्या 254 आहे.आणि बांधकाम सुरू असलेले घरकुलांची संख्या 3774 आहे त्यात एकूण लाभार्थ्यांची संख्या 1339 आहे. घटक क्रमांक 3 मध्ये एकूण 45 हजार अर्ज आले आहेत.यावेळी सहा. अभियंता शांताराम अवताडे, हिदायत मुजावर, आदिल मौलवी, दिडडी, शैलेश करवा, गुंड, तांत्रिक तज्ञ सिद्धाराम मेंडगुदले, नागनाथ पद्मगोंडे, स्वप्निल गायकवाड, पूजा भुतनाळे आदी मान्यवर उपस्थित होते.