येस न्युज नेटवर्क : कर्नाटकच्या हुबळीमध्ये आज भीषण रस्ते अपघात घडला आहे. प्रवासी बस आणि लॉरी यांच्यात झालेल्या या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 26 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर KIMS रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवारी रात्री हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी बस कोल्हापूरहून बंगळुरूकडे जात होती. यावेळी कर्नाटकच्या हुबळी शहराच्या बाहेर रात्री 12:30 ते 1 वाजण्याच्या सुमारास या प्रवासी बस आणि लॉरी यांच्यात जोरदार धडक झाली. या धडकेत 7 जण ठार तर 26 जखमी झाले. धारवाडकडे जाणाऱ्या लॉरीला बसची धडक बसली तेव्हा बसचालक ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता