येस न्युज नेटवर्क : भारताचे नवे मुख्य चुनाव आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव कुमार हे 15 मे रोजी आपला पदाचा कार्यभार हाती घेतील. राजीव कुमार हे सुशील चंद्रा यांची जागा घेतील. 14 मे 2022 रोजी सुशील चंद्रा यांचा मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कार्यकाळ पूर्ण होईल. विधी मंत्रालयानं यासंदर्भात अधिसूचना जारी करत राजीव कुमार यांची नियुक्ती मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून केलं असल्याचं सांगितलं आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी देखील यासंदर्भात ट्वीट केलं असून त्यांनी नवनियुक्त मुख्य निवडणूक आयुक्ताचं अभिनंदन केलं आहे.