मोहोळ तालुक्यात दौऱ्यावर असताना पोखरापुर गावभेट नंतर मोहोळ कडे जात असताना पोखरापुर येथे महामार्गावर दोन मोटारसायकलचा अपघात झाला.या अपघातात शेटफळ(ता.पंढरपूर) येथील सिध्देश्वर तापकिरे व नान्नज(उ.सोलापूर) येथील ज्योती घोडके या “बाप लेकीला”आमदार यशवंत माने यांनी अपघातस्थळी गाडी थांबवून अपघातग्रस्त बाप लेकीला स्व:ताच्या गाडीत बसवून मोहोळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.व डॉक्टर यांना त्वरित उपचार करण्याच्या केल्या.वडील सिध्देश्वर तापकिरे यांच्या पायाला फॅक्चर झाले असून पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले आहे.