सोलापूर : राजर्षी शाहू महाराजांचे स्मृतीशताब्दी वर्ष 2022 हे वर्ष असून महाराष्ट्र शासन हे वर्ष कृतज्ञता पर्व म्हणून साजरे करत आहे. या कृतज्ञता पर्वात शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी छत्रपती शाहू स्मृती शताब्दी समिती, सोलापूर यांच्यावतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे 6 मे 2022 रोजी सकाळी 10 वाजता शाहू महाराजांना 100 सेकंद स्तब्ध उभे राहून वंदन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, माजी विरोधी पक्षनेते अमोल शिंदे,विशेष अधिकारी सुलोचना सोनवणे, शताब्दी समितीचे विश्वस्त माऊली पवार, आशुतोष तोंडसे, सचिन शिंदे,नाना काळे, विनोद भोसले, मनोहर सपाटे, राजन जाधव,अजित बनसोडे, धर्मेंद्र चंदनशिवे,बाळासाहेब वाघमारे,श्रीकांत डांगे, शिवाजी वाघमोडे, मदन पोलके, सुभाष गायकवाड आदी पस्थित होते.