सोलापूर पुणे रोडवर मडके वस्ती भागात दुचाकीस्वार मुलीचा अपघातात जागीच मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.आज गुरुवारी सायंकाळी सदर घटना घडली.घरी येत असताना सोलापूर शहरातील बाळे भागातील मुलीचा दुर्दैवी अंत झाला. आज गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली.MH 13 Dk 6109 या ऍक्टिवा गाडीचा नंबर आहे.Mh46 AR 6188 कंटेनरच्या धडकेत तिचा दुर्देवी अंत झाला.बार्शी रोड वरील नामदेव सोसायटी भागात राहत असणारी वैष्णवी संतोष सरवदे वय वर्ष साधारण 20 ही मुलगी संगमेश्वर कॉलेज मध्ये शिकत होती. एक्टिवा गाडी वरून घरी येत असताना मडके वस्ती परिसरात कंटेनरच्या धडकेत तिचा दुर्दैवी अंत झाला. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.