सोलापूर : हिंदू नववर्षानिमित्त अर्थात गुढी पाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष महोत्सव समितीतर्फे यंदा शहरात ७५ ठिकाणी भारतमाता पूजन करण्यात येणार आहे. तसेच त्याचदिवशी सायंकाळी ६.१५ वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात संगीत संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उत्सव समिती अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गड्डम म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे हिंदू नववर्ष स्वागत व शोभायात्रा करता आली नाही. यंदाच्यावर्षी शनिवारी (ता. २ एप्रिल) रोजी गुढी पाडवा आहे. यावर्षी शहरात ७५ भागात हिंदू नववर्ष स्वागत मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे.
हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळून यंदा ७५ वर्षे झाली आहेत. यंदा या अमृत महोत्सवानिमित्त शहरातील ७५ ठिकाणी हिंदू नववर्ष स्वागत समितीच्यावतीने नववर्षाचे स्वागत करण्यात येणार आहेत. यात या सर्व ७५ ठिकाणी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. तसेच शनिवारी गुढी पाडव्यादिवशी सायं. ६.१५ वाजता हुतात्मा स्मृति मंदीर येथे हिंदु नववर्ष स्वागत, गुढी पाडवा व हिंदु उत्सवाला अनुसरून आरोह प्रस्तुत संगीतसंध्या हा गीतांचा कार्यक्रम होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ज्ञानेश्वर म्याकल यांनी केले.
या पत्रकार परिषदेस कोषाध्यक्ष नितिन करवा, ज्ञानेश्वर म्याकल, गावठाण विभाग प्रमुख चिदानंद मुस्तारे, सहप्रमुख अनिल जोशी, रविंद्र नाशिककर आदी उपस्थित होते.
हिंदू नववर्ष स्वागत कार्यक्रमासाठी सोलापूर शहराची तीन भागात विभागणी करून जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. ती पुढीलप्रमाणे :
मुख्य समिती : संस्थापक अध्यक्ष – रंगनाथजी बंग, उत्सव समिती अध्यक्ष – पेंट्टप्पा गड्डम , कोषाध्यक्ष – नितीन करवा.
सल्लागार – जयनारायण भुतडा, दामोदर दरगड, मनमोहन भुतडा, वल्लभदास गोयदानी.
कार्यालय प्रमुख- अशोक केंची, प्रसिध्दी प्रमुख – पुरूषोत्तम कारकल.
पूर्व विभाग :
अध्यक्ष – ज्ञानेश्वर म्याकल, प्रमुख – जगदीश कर्रे, सहप्रमुख – आनंद गोसकी, सतीश जिरांगकलगी, श्रीकांत जिट्टा, भालचंद्र मच्छा, महिला प्रमुख – इंदिरा कुडक्याल, अश्विनी चव्हाण.
गावठाण भाग
अध्यक्ष – चिदानंद मुस्तार, कार्यक्रम प्रमुख – गंगाधर गवसणे, सह प्रमुख – रामानुजय होलाणी, बाबुलाल वर्मा, अनिल जोशी, मदन मोरे, कमलकिशोर राठी, महिला प्रमुख – पुष्पाताई गुंगे
जुळे सोलापूर हद्दवाढ भाग
अध्यक्ष – प्रा.डॉ. नरेंद्र काटीकर, कार्यक्रम प्रमुख – रविंद्र नासिकर, प्रवीण तळे, विकास कुलकर्णी, दैदिप्य वडापूरकर, मिलिंद माईणकर, अॅड. दिनेश अय्यर, महिला प्रमुख-अॅड. शर्वरी रानडे.
हुतात्मा स्मृति मंदीर कार्यक्रम प्रमुख :
वरदराज बंग, मदन मोरे, प्रशांत बडवे, अॅड. प्रदिपसिंग राजपूत, अशोक संकलेचा, किरण सुतार, व्यंंकटेश कंची, मिलिंद फडके.