त्या महिला भाविक भक्ताची कुटुंबाला भेट होण्यासाठी सोशल मिडीयावर गणेश अंकुशराव यांनी केले होते आव्हान…!!!
पंढरपूर – आज पंढरपूर येथील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे चौक अंबाबाई स्टॉप येथे एक वयोवृद्ध महिला आम्हाला आढळली. आम्ही विचारपूस केली असता आम्हाला समजलं कि ती महिला हरवली आहे. त्यांच्या माणसापासून भटकली आहे. त्यांची चुकामुक चंद्रभागेच्या पात्रात झाली होती.
त्या महिलेचे वय 70 ते 75 च्या दरम्यान होतं. त्या महिलेचे नाव मनुखा नामदेव धाड तालुका- पुसद, जिल्हा- यवतमाळ होतं.
आम्ही आमचे महर्षी वाल्मिकी संघाच्या कार्यकर्त्यांमार्फत रिक्षा पाठवल्या, चंद्रभागेत माणसं पाठवली, अनेक भागात आम्ही शोधा शोध सुरू केली व फेसबुक व्हाट्सअप च्या माध्यमातून आम्ही जाहीर आवाहन केलं की या महिलेला न्याय मिळाला पाहिजे. त्या महिलेचा परिवार आहे. तू पंढरपुरात आम्हाला सापडला पाहिजे असे आवाहन केले. त्या महिलेला घेऊन आम्ही कॉन्टॅक्ट केला असता मंदिर समितीचा जो अत्यावश्यक सेवा विभाग आहे. त्या विभागाशी संपर्क केला असता. त्यांचे नातेवाईक तिथे आम्हाला आढळले. आम्ही त्यांना आमच्या गाडीवर बसून आम्ही त्यांना मंदिरापाशी सोडलं व त्या तुटलेल्या परिवाराला आम्ही एकत्र केलं आम्ही त्या महिलेला घेऊन गेल्या गेल्या त्यांच्यातील महिलांच्या व पुरुषांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि त्यांनी आमच्या आभार मानले पंढरपूरकर यांचे आभार मानले त्यांनी असं मत व्यक्त केलं की पंढरपूरची जनता खरंच माणुसकीचे आहे. आणि आम्हाला खरंच आज माणुसकीचे दर्शन घेतलं आणि आमची म्हातारी वयोवृद्ध महिला तुमच्यामुळे आम्हाला सुखरूप मिळाली असं समाधान त्यांनी व्यक्त केलं आणि हे काम करून आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या कार्यकर्त्यांना भरपूर समाधान मिळालं आणि अशीच काम आम्ही येणाऱ्या काळामध्ये भरपूर करू असंही आम्ही व्यक्त केले. यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव,संपत सर्जे, महावीर अभंगराव,