सांगली : जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील झेनपुरा आतंकवाद्यांच्या शोध मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत सांगलीच्या वाळवा तालुक्यातील शिगाव येथील रोमित तानाजी चव्हाण यांना वयाच्या 23 व्या वर्षी यांना वीरमरण आले. चव्हाण यांची शिगाव गावातून अंत्ययात्रा गावातून वारणा नदीकाठी आली. वारणा नदीकाठी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, माजी मंत्री सदाभाऊ खोत प्रशासकीय अधिकारी आणि गावकरी उपस्थित होते. अत्यंत शोकाकुल वातावरणात अमर रहे अशा घोषणा देत अंत्यसंस्कार करण्यात आले. पालकमंत्री जयंत पाटील यावेळी दु:ख व्यक्त करत म्हटलं की, पाच वर्षापूर्वी रोमित पाच वर्षापूर्वी सैन्यात सामिल झाला. रोमित अत्यंत धाडसी असा होता. आतंकवाद्यांना प्रतिउत्तर देताना रोमितला वीरमरण आले आहे. एक अतिशय कर्तबगार असा जवान शहीद झाला. शिगाव गावचा तो बहुमान होता. आम्हा सर्वांना रोमितचा सदैव अभिमान राहिल, त्याचं योगदान आम्ही कधी विसरणार नाही, असं पाटील म्हणाले.