सोलापूर : आदर्श राष्ट्रमाता जिजाऊ, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ज्ञानाची संस्कारक्षम शिदोरी आपल्या विद्यार्थ्याच्या जीवनात निर्माण व्हावी यासाठी सिध्दार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर यांनी जिल्हास्तरीय ऑनलाईन सन्मान :- जिजाऊ – सावित्रीच्या बालचमूचा २०२२ चे आयोजन केले आहे. यात जिजाऊ ते सावित्री यांच्या जीवनचरित्रार आधारीत ऑनलाईन वेशभूषा (इ.1ली व 2 री) , काव्यगायन व चित्रकत्रा (3रीते5वी) निबंध व भाषण(6वीते 8 वी) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आले . दि3 जानेवारी ते 10 जानेवारी या कालावधीत स्पर्धा घेण्यात आली .दि 12 जानेवारी रोजी या जिल्हास्तरीय ऑनलाईन स्पर्धेचे अंतिम निकाल ऑनलाइन पध्दतीने घोषित करण्यात आल्रे.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून गोविंद नांदेडे (पूर्व प्राथमिक शिक्षण संचालक, पुणे), योगिराज वाघमारे ( सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी व जेष्ठ साहित्यिक सोलापूर), अरूण गायकवाड (सचिव, सिध्दार्थ शिक्षण प्रसारक मंडळ, सोलापूर), सुनिता गायकवाड (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती आदर्श बालक मंदिर सोलापूर), जनार्दन वाघमारे उपस्थित होते . या स्पर्धेत एकूण 140 सहभागी होते. त्यातील 25 विद्यार्थ्यांची प्रत्येक गटानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.आदर्श बालक मंदीर या शाळेतील 5 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.कोव्हिड -19 च्या काळात 2 ते3 वर्ष मुले ऑनलाइनच्या माध्यमातून एकांगी बनत राहिले. त्यामुळे त्या विदयार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्हास्तरीय ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.