सोलापूर । खड्यांमुळे शहरातील प्रमुख रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले असून आसरा रेल्वे ब्रीज व परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. हे रस्ते महापालि तातडीने तयार करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाकडे लावून धरली असून यासंदर्भात आयुक्तांकडे नगरसेविका राजश्री चव्हाण आणि इतर नगरसेवकांनी निवेदन सादर केले आहे.
कायम गर्दीचे ठिकाण असलेल्या आसरा चौक व परिसरातील रस्ते, आसरा ब्रीज ते विजापूर रोड, डी मार्ट पाणी टाकी ते बॉम्बे पार्क व गरूनानक चौक ते जना बोरामणी Iनाका यासह शहरातील इतर अनेक भागातील मुख्य रस्ते खराब झाले आहेत. गुरूनानक चौक ते जुना बोरामणी नाका या रस्त्यावरून महामार्गावरील जड वाहतूक व लिका परिसरातील नागरिकांच्या वाहनांची कांना मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. नवेदन आसरा चौक व परिसरात नई जिंदगीकडे जाणाऱ्या रस्त्यासह इतर रस्त्यांवर या परिसरातील संपूर्ण रहिवाशांची सततची ये-जा, जड वाहतूकीची वर्दळ असते. या रस्त्याची ही गेल्या पाच वर्षापासून अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. या सर्व रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण करून घेण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे.