सोलापूर : सोलापूरच्या मल्लिनाथ चौधरी यांना २०२१ चा राज्यस्तरीय क्रांतीवीर वसंतराव नाईक पुरस्कार जाहीर झाला आहे. वसंतराव नाईक सोशल फाऊंडेशनच्या वतीने नाशिक येथे आयोजित हा कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मानचिन्ह देण्यात आले. निर्मळ मनाने सेवावृत्तीने अव्याहतपणे सुरु असलेले आपले काम खरोखरच दखलपात्र आहे सामाजिक कार्य या विविध माध्यमातुन करित असलेल्या समाजसेवा हे कार्य निश्चितपणे वाखाणण्यासारखे आहे. आपले हे निस्वार्थ सेवाकार्य जनसामान्यांना दिपस्थंबासारखे ठरावे असे समाजकल्याण न्यासचे राष्ट्रीय अध्यक्ष सोन्या पाटील यांनी पुरस्कार देताना सांगीतले. महाराष्ट्र राज्यातील इतर ५१ लोकांना देखील सामाजिक कार्य बद्दल हा पुरस्कार यावेळी देण्यात आला. तसेच किशोर शेटे यांनी सर्वाना शुभेच्छा देत फाऊंडेशनचे आभार मानले.
यावेळी संस्थचे अध्यक्ष नंदु सानप यांनी त्यांचे बहुमोल भाषन केले. राष्ट्रीय ओबीसी ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष किशोर शेटे साहेब यांच्या माध्यमातुन काम केल्या मुळे आमच्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार मिळाला त्यांचे व संघटनेचे आभारी आहे तसेच ओबीसी संघटनेच्या आठ कार्य करर्त्यांना हा सन्मान मिळाला आहे. किशोरजी शेटे, जयश्री राजकुमार ढेपे आक्कलकोट आलका विभुते, वकिल जाधव, लोखंडे, नसिमा शेतसंदी, सुनिता गायकवाड या सर्वांचा सन्मान पत्र सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्या आला.