येस न्युज मराठी नेटवर्क आर.एस.मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने म.न.पा. शाळा क्र.११ येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे भेट स्वरुपात वाटप करण्यात आले. कोरोना महामारीमुळे गेली दिड वर्षे शाळा बंद होत्या. तसेच येथील शाळकरी विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक स्थिती जेमतेम असल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होऊ नये, यासाठी संस्थेच्या वतीने युवा उद्योजक निखिल कोयले यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शैक्षणिक हितासोबतच सामाजिक भान जपता यावे या हेतुने आर.एस.संस्थेची कार्यप्रणाली काम करत असते .
यावेळी संस्थेचे संस्थापक रविंद्र सरवदे, सुधाकर गुंडेली, मदन वडावराव, नरके सर, समीर नदाफ, राजय्या गज्जम, राजू चिप्पा, अशोक वडनाल, रोहित जगताप, सागर बाबरे, मॉंटी बाबरे, नितीन कांबळे, अनिकेत जगताप, विवेक इंगळे, सोहन सोनकांबळे, आदित्य बाबरे, सौरभ ईबतहळ्ळी, सोनु बाबरे, रोहन कांबळे, अथर्व बाबरे, शुभम ईबतहळ्ळी, सागर कांबळे व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
तसेच मिळालेल्या भेटवस्तुमुळे विद्यार्थांचा आनंद द्विगुणीत झाला.