सोलापूर : सांगोला तालुका पंचायत समितीचे पहिले सभापती,सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष,सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ लोटेवाडी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त संभाजीराव तथा दादासाहेब शेंडे यांची जयंती देशभक्त संभाजीराव शेंडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मेडशिंगी येथे उत्साहात संपन्न झाली.याप्रसंगी दादासाहेबांच्या समाधीचे दर्शन व पुतळ्यास पुष्पहार अर्पण कार्यक्रम पार पडला.
तसेच दादासाहेबांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उदघाटन डॉ.प्रमोद जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. रेवनील ब्लड बँक यांच्या सहकार्याने हे शिबीर संपन्न झाले.या रक्तदान शिबिरामध्ये 81 जणांनी सहभाग नोंदविला. याप्रसंगी बाबुरावजी गायकवाड (अध्यक्ष,सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ), मा.श्री.अरुण भाऊ शेंडे(अध्यक्ष, सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ,लोटेवाडी), वैजिनाथ काका घोंगडे (सचिव-स्मृती समारोह समिती), प्राचार्य डॉ.मधुसूदन बचुटे,म.सी.झिरपे,जयंत डोंगरे सर,विजय बापू इंगवले,प्रकाश शिंदे, महिमकर,प्रा.वलेकर, सोमेश यावलकर,संस्थेतील पदाधिकारी,सर्व मुख्याध्यापक,पर्यवेक्षक,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,रक्तदाते,ग्रामस्थ उपस्थित होते.