सोलापूर : रस्त्याच्या कामाचे बिल काढण्याकरिता तीन टक्के प्रमाणे १ लाख रुपये व नवीन काम मिळवून देण्याकरता २६ हजार अशी एकूण १ लाख २६ हजार लाचेच्या मागणीवरून अँटी करप्शनने कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले.
लोकसेवक वडजे, मुख्याधिकारी, नगरपंचायत माळशिरस यांनी तक्रारदार यांचेकडे माऊली चौक, माळशिरस ते कचरेवाडी हद्दीपर्यंतच्या रस्ता डांबरीकरण्याचे कामाच्या बिलाचा चेक तिरूपती कन्स्ट्रक्शन यांचे बँक खात्यावर जमा केल्याच्या मोबदल्यात बिलाच्या ३ टक्के रक्कम लाच म्हणून मागीतली असल्याबाबत दि.३०.०९.२०२१ रोजी तक्रारदार यांनी त्यांचा तक्रारी अर्ज अॅन्टी करप्शन ब्युरो सांगली यांचेकडे दिला होता.