येस न्युज मराठी नेटवर्क : शिवसुर्य प्रतिष्ठानच्या वतीने शिवसुर्य प्रतिष्ठान च्या वतीने भव्य किल्ले स्पर्धा च्या पारितोषिक वितरणाचा आणि कोरोनाच्या काळात निस्वार्थ सामाजिक सेवा करणाऱ्या ला कोविड योध्दा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी आरमार चे संस्थापक अध्यक्ष मा.श्री श्रीकांत बापू डांगे होते.तसेच संभाजी आरमार चे कार्याध्यक्ष वाघमोडे,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे विभाग संयोजक श्री.प्रणव बडगंटी, प्रार्थाना फाऊंडेशनचे संस्थापक श्री. प्रसाद मोहिते, दीनानाथ शेळके , कार्तिक अनागुंडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कोरोनाच्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता निस्वार्थ समाजसेवा करणाऱ्या समाजसेविका सौ.अनुताई मोहिते, राॅबीड हूड आर्मी चे श्री.हिंदुराव गोरे,रोहित थळवे, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी श्री.अंजिक्य माने , वैद्यकीय क्षेत्रातील डॉ.निनाद मोहिते यांना कोविड योध्दा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
भव्य किल्ले स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक राज चव्हाण, द्वितीय क्रमांक अविष्कार कुलकर्णी, तृतीय क्रमांक रूत्विक कडगंची यांना पारितोषिक देण्यात आले.
यावेळी प्रसाद गवई, ओंकार हिरेहब्बू, सुदर्शन कदम, शंतनू जाकनाईक, तेजस राठोड, प्रशांत जाधव, अमरनाथ कुसुमकर, संकेत कोळी, शुभम गौर, आदित्य अनागुंडे, प्रल्हाद गवई, यश धोत्रे, प्रणव पाटील,ओंकार रणसुभे, सिद्धांत धोत्रे, संस्कार शिंदे, ओंकार हत्ती उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश हारकुड आणि प्रास्ताविक आदित्य माने तर आभार शिव उटगे यांनी केले.