येस न्युज मराठी नेटवर्क : श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील आस्थिव्यंगोपचार विभागातील ऑपरेशन थिअटर मध्ये अर्थो ड्रिल मशीन बंद असल्यामुळे रुग्णांना शस्त्रकिया उपचार करणे कठिण होत असे . तीन अर्थो ड्रिलमशीन मिळावी या करीता अधिष्ठता श्री . संजीव ठाकूर यांनी बालाजी अमाईन्सच्या संचालक मंडळाकडे ३ तीन अर्थो ड्रिल मशीनची मागणी केली . नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचलक श्री . डी . राम रेडडी यांना भेटून अर्थो . ड्रिल मशीन ची मागणी केली . बालाजी अमाईन्सच्या संचालक मंडळानी अर्थो ड्रिल मशीनमुळे रुग्णांना शस्त्रक्रिया साठी त्रास होऊ नये याकरीता त्वरीत तीन मनमन कंपनीच्या अर्थों .ड्रिल मशीन मागवण्यात आल्या आहेत व आज त्या सर्व मशीन्स डॉ . वैशंपायन स्मृती शासकीय वैदयकीय महाविदयालाचे अधिष्ठता डॉ.संजीव ठाकूर यांचे कडे सोपविण्यात आले . या प्रसंगी रुग्णालयाचे सुनील हंढाळीमठ ,डॉ . पुष्पा अग्रवाल ,डॉ . आर .डी . जयकर ,नगरसेवक बाबा मिस्त्री ,तसेच अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभागातील सर्व स्टाफ उपस्थित होता . याप्रसंगी अधिष्ठता डॉ . संजीव ठाकूर यांनी बालाजी अमाईन्सचे संचालक मंडळ व व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांचे कोरोनाकाळात केलेल्या कामाचे कौतुक केले व तीन मनमन अर्थो ड्रिल मशीन दिल्याबद्दल आभार मानले .