पुणे : येथील औंध येथे १४ नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्याचे औंध चे लहान मुलांना आवडणारे व ज्यांना लहान मुले चाचा नेहरू सारखे प्रिय आहे असे पुण्याचे माजी महापौर. दत्ता गायकवाड यांनी बालदिनाच्या दिवशी लहान मुलांसाठी बालमेळाव्याचे आयोजन रविवारी औंध येथे केले.दोन वर्ष कोरोना मुळे लहान मुलांना पिंजऱ्यात कोंडलेल्या पक्षा प्रमाणे झाले आहे पुण्यात कोरोना प्रमाण कमी झाले आहे पुण्याचा लाॅकडाऊन काढण्यात आला त्यामुळे सगळ्यांना मोकळा श्वास घेता आला.मुलांना सर्व मोकळे झाले.
अशा वेळी बालदिनाच्या निमित्ताने मुलांना मुक्त खेळता यावे हयाचा विचार करून दत्ता गायकवाड यांनी बालदिनाच्या दिवशी लहान मुलांसाठी बालमेळाव्याचे आयोजन औंध येथे केले हया मेळाव्यात लहान मुलांसाठी त्यांनी विविध मुलांच्या आवडीचे खेळ आणले होते. जसे मिकी ऊस.घसरगुंडी.घोडे.घोडागाडी.जपिंग. असे विविध प्रकारचे खेळ आणले होते.हा कार्यक्रम लहान मुलांसाठी औंध येथील गोळवलकर गुरुजी प्राथमिक शाळेजवळ संध्याकाळी ५ ते ८ मेळाव्याच्या निमित्ताने मुलांसाठी भरविण्यात आला होता.तेथे त्यांनी मुलांना स्वताहा घोडा गाडी.तसेच घोड्यावर बसवून ते मुलांना विविध खेळ खेळण्यास रममाण केले व ते सुद्धा त्यांच्यात रममाण झाले.
मुलांना पाण्याची तहान लागली की त्यांनी मुलांना पाण्याची बाटली स्वताहा देऊन त्यांची काळजी घेतली. सर्व खेळ मुलांनी खेळून झाल्यावर त्यांनी मुलांना कार्यक्रमाच्या शेवटी ९०० मुला-मुलींना खाऊ देऊन मुलांना खुष केले. लहान मुलांनी त्यांच्या बरोबर व मिकी माऊस बरोबर सेल्फी काढून सर्व खेळांचा आनंद व्यक्त केला.अशा प्रकारे काही वेळासाठी लहान मुलांसाठी बालमेळाव्या च्या निमित्ताने मुलांसाठी खेळा द्वारे मुलांना खेळण्यासाठी खेळाचे व्यास पीठ निर्माण करून बालदिनाच्या दिवशी लहान मुलांना आनंदी केले. या बालमेळाव्याचे आयोजन पुण्याचे माजी महापौर दत्ता गायकवाड . तसेच औंध च्या माजी नगरसेविका सौ.संगिता गायकवाड व गायकवाड मित्र परिवाराने केले होते. यावेळी बबनराव कुंभार, कलापुरे अशा प्रतिष्ठीत ग्रामस्थ व व्यक्ती उपस्थित होत्या. अशा प्रकारे दत्ता गायकवाड यांनी बालदिनाच्या दिवशी लहान मुलांना आनंदी करून खुष करून बालदिन बालमेळाव्याच्या रूपात साजरा औंध येथे केला गेला.