सोलापूर : अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने बाल गोपाळ मावळ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व शिवरायांच्या जीवनात किल्यांना अनन्य साधारण महत्व असलेल्या किल्यांचा जागर व्हावा म्हणून अपरिचित सामाजिक संस्थेच्या वतीने किल्ले बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत ३७ बाल मावळ्यांनी सहभाग घेतला सर्व स्पर्धकांना महेश धाराशीवकर, चन्नवीर चिट्टे, अनिल बुरांडे संस्थापक अध्यक्ष मयुर गवते यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र देण्यात आले. कै.चौडप्पा रामकृष्ण उदगीरी यांच्या स्मरणार्थ सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी चन्नवीर चिट्टे यांनी संस्थेच्या कार्याची स्तुती केली व कोरोना मुळे मुलांना खेळणे बागडणे अवघड झाले होते. अपरिचित संस्थेच्या किल्ला बनविने स्पर्धा हि प्रेरणादाई आहे असे मत व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश धाराशीवकर यांनी बाल मावळ्यांना गड किल्यांची माहिती दिली व या कार्यक्रमामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्माणाच्या कार्याला उजाळा मिळतो असे म्हटले
कार्यक्रमाची प्रास्ताविक मयुर गवते यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.विक्रम बायस यांनी केले तर आभार प्रदर्शन मल्लिनाथ स्वामी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगमेश्वर अरवटगीमठ, शिवशरण दुर्गे, नरेश मुन्नुरेड्डी, भरत गवते,विनोद कर्पेकर, संतोष सबसगी, सोम् चडचणकर, रावसाहेब सावंत, श्रीकांत बच्चल, ओम कर्पेकर आदींनी परिश्रम घेतले.
प्रथम क्रमांक
संकल्प दत्तात्रय भोसले यांनी बनवलेले सिंहगड किल्ला
व्दितीय क्रमांक
मयुरेश युवराज जाधव यांनी बनवलेला सिंधुदुर्ग किल्ला
तृतीय क्रमांक
चंदन गुरूनाथ जावळे यांनी बनवलेला जंजिरा किल्ला