औरंगाबाद : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी प्राध्यापक भरतीबाबत मोठी घोषणा केलीय. राज्यात प्राध्यापक आणि प्राचर्य भरतीला मंजुरी मिळाली आहे. तसंच 5 हजार हजार प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करु, अशी घोषणाच उदय सामंत यांनी केली आहे. राज्यात 8 हजार प्राध्यापकांची भरती 7 महिन्यात पूर्ण केली जाईल. येणाऱ्या शैक्षणिक वर्षांपासून हे प्राध्यापक रुजू होतील, असं सामंत यांनी जाहीर केलं.
राज्यातील प्राध्यापक भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी गेल्या कित्येक महिन्यांपासून केली जात आहे. यासाठी राज्यात पुणे, मुंबई तसेच इतर जिल्ह्यांत आंदोलनदेखील करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्राध्यापक भरतीबाबत महत्वनाचा निर्णय घेतला आहे दोन दिवसांपूर्वी उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे त्याबाबत महत्वाची माहिती दिली होती.