सोलापूर : १५ वा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दिनांक १४ ते १७ डिसेंबर या कालावधीत पार पडणार असून यंदा प्रथमच हा महोत्सव ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. यंदाच्या वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे नवीन बोधचिन्ह प्रकाशित करत असल्याची माहिती संचालक वीरेंद्र चित्राव यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस विलास खरात, ऋषिकेश कुलकर्णी, दैदिप्य वडापूरकर, डॉ.रवींद्र चिंचोलकर, डॉ. नरेंद्र काटीकर यांची उपस्थिती होती.