येस न्युज मराठी नेटवर्क : भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार यंदाची दिवाळी ही गरजू, वंचित, दुर्बल, गटासोबत साजरी करावी असे सांगितले होते त्यांच्या आवाहनानुसार प्रभाग 26 च्या नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी प्रार्थना फाउंडेशन येथे वंचित निराधार विद्यार्थी यांना दीपावलीचे फराळ देऊन त्यांची दिवाळी गोड केली. त्यावेळी त्यांचे तोंडावर हास्य उमटले होते. खऱ्या अर्थाने त्यांचा आनंद विद्यार्थ्यांच्या तोंडावर जाणवत होता.
त्यावेळी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी सांगितले की खऱ्या अर्थाने आज दीपावली साजरी झाली व वंचित्त, निराधार विद्यार्थ्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले त्यावेळी प्रार्थना फाऊंडेशनचे संचालक श्री प्रसाद मोहिते यांनी प्रथम नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांचे स्वागत केले व नंतर प्रार्थना फाऊंडेशनचे उद्दिष्ट काय आहे याची माहिती दिली त्यावेळी अनु प्रसाद मोहिते,अनिल चव्हाण, प्रकाश चव्हाण, आदी उपस्थित होते.