सोलापूर ; जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने सर्व धर्मिय कर्मचाऱ्यांसाठी दिपावली फराळाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कर्मचाऱ्यांमधील आपसी सलोखा वाढीस लागण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे नेहमीच कर्मचाऱ्यांसह प्रशासनास सहकार्य असते. समाजउपोयगी वेगवेगळे उपक्रम नेहमीच युनियनच्या माध्यमातून केले जातात.
यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसींह पवार, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, उपभियंता मुनाफ अडते,प्रशासन अधिकारी ए.ए.सय्यद, व जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील अनेक कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक राज्यसरचिटनीस विवेक लिंगराज यांनी तर आभार महिबूब निटोरे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी दयानंद परिचारक, डॉ.एस.पी.माने,श्रीशैल्य देशमुख,राजीव गाडेकर,राकेश सोडी,संतोष शिंदे, प्रभाकर डोइजोडे,तजमुल मुतावली,दीपक माने,त्रिमूर्ती राऊत,श्रीधर कलशेट्टी, नागेश कदम, बाळासाहेब महमाने,विनय बनसोडे आदींनी परिश्रम घेतले.