नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री लालकृष्ण अडवाणी आज सोमवारी त्यांचा 94 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पक्षाच्या इतर ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या तसंच त्यांच्या दीर्घायुष्याबद्दल मनोकामना व्यक्त केल्या.
देश कायम अडवणींच्या ऋणात राहील- पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन अडवाणींन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आदरणीय अडवाणीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो. लोकांचे सक्षमीकरण आणि भारताचा सांस्कृतिक अभिमान वाढवण्यासाठी त्यांनी केलेल्या अनेक प्रयत्नांसाठी देश त्यांचा ऋणी राहील. त्यांच्या बौद्धिक क्षमतेसाठीही त्यांचा सर्वत्र आदर केला जातो. देश त्यांच्या कायम ऋणात राहिल, अशा शब्दात मोदींनी लालकृष्ण अडवाणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रेरणास्त्रोताला वाढदिवसाच्या शुभेच्छा- जे पी नड्डा
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्विट करत लालकृष्ण अडवाणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘भाजपला जनसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या आणि देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आदरणीय श्री लालकृष्ण अडवाणीजींना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. अडवाणीजी पक्षाच्या करोडो कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान आहेत. तुम्हाला दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.