येस न्युज नेटवर्क : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आणखी एक धक्का बसला आहे. मुंबई हायकोर्टाने अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. याआधी शनिवारी अनिल देशमुख यांना विशेष पीएमएलए कोर्टाने 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली होती. मात्र, ईडीने त्याविरोधात हायकोर्टात धाव घेतली. त्यानंतर हायकोर्टाने देशमुख यांना ईडी कोठडी सुनावली आहे.
शनिवारी ईडी कोठडी संपल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुनावणीसाठी कोर्टात हजेरी लावली होती. ईडीकडून देशमुख्यांच्या 9 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. पण ती न्यायालयाने नाकारली आणि देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर अनिल देशमुख यांची रवानगी ऑर्थर रोड तुरुंगात करण्यात आली. विशेष पीएमएलए कोर्टाने ईडीची कोठडी देण्याची मागणी फेटाळत देशमुख यांना न्यायलयीन कोठडी सुनावली. त्यानंतर ईडीने हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने पीएमएलए कोर्टाचा निर्णय रद्द करत अनिल देशमुख यांना ईडी कोठडी सुनावली. देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी असणार आहेत.