सोलापूर : आजपासून सलीम अली यांच्या आठवणीनिमित्त पक्षी सप्ताहाला सुरुवात झाली. पक्षी सप्ताहानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केल्याची माहिती उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दिली. ५ ते १२ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत हा सप्ताह होणार आहे.
सप्ताहानिमित्त मारुती चित्तमपल्ली यांची भेट घेवून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. वनपरिक्षेत्रातील सिध्देश्वर वनविहार येथील भिंतीना विविध पशु व पक्ष्यांच्या छायाचित्राने रंगविण्यात आले आहे. सप्ताहामध्ये जिल्ह्यामध्ये निबंध, घोषवाक्य, चित्रकला, पक्षी छायाचित्र स्पर्धा, अधिकारी व कर्मचारी यांना पक्षीविषयक मार्गदर्शन कार्यशाळा, चर्चासत्र, लोगोचे अनावरण होणार आहे. पक्षी सप्ताहाची सांगता बक्षीस वितरणाने करण्यात येणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.