येणकी : मोहोळ तालुक्यातील मौजे येणकी ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायत कर रक्कम भरणार्या प्रत्येक कुटुंबास बाळराजे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान सरपंच पोपटराव जाधव यांनी दिवाळी सणासाठी रक्कम रू 20 दराने 20 किलो प्रत्यक्ष साखर वाटप करून स्तुत्य उपक्रम राबविला आहे. तसेच भविष्यात यापुढेही दरवर्षी साखरे बरोबर इतरही अनेक नवीन उपक्रम राबविणार असल्याचा संकल्प सरपंच पोपटराव जाधव यांनी व्यक्त केला.
त्यामुळे येथून पुढे दरवर्षी येणकी गावात दिवाळी गोड होणार असल्याचे सरपंचानी सांगितले.
या सदर स्तुत्य उपक्रमाचा गावातील गोर-गरीब जनतेला लाभ होणार आहे. सदर स्तुत्य उपक्रमाचा गावातील एकूण 71 कुटुंबानी लाभ घेतला. तसेच यापुढे ही ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येणार्या नवनवीन उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी राहिलेल्या गावातील सर्व कुटुंबाने ग्रामपंचायत ची कर रक्कम भरून ग्रामपंचायत ला सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच पोपटराव जाधव यांनी केले आहे. यावेळी सरपंच पोपटराव जाधव, उपसरपंच आकाश खरात , सर्व मा.ग्रामपंचायत सदस्य, गावातील विविध प्रतिष्ठित मान्यवर, लाभार्थी व इतर अन्य ग्रामस्थ उपस्थित होते .