अक्कलकोट : दिवंगत सुप्रसिद्ध अभिनेते पुनीत राजकुमार यांच्या अचानक निधनामुळे त्यांच्या सर्व चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील कोर्सेगांव येथील चाहत्यांनी दिवाळी न साजरा करता पुनीत राजकुमार सरांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी कोर्सेगावातील सर्व युवामंच उपस्थित होते. याप्रसंगी सुपरस्टार पुनीत राजकुमार यांना दोन मिनिटे मौन राहुन आदरांजली वाहण्यात आली.

पुनीत राजकुमार यांचे कार्य
- 26 अनार्थआश्रम
- 16 वृद्धाश्रम
- 46 मोफत शाळा
- 1800 मुलांना मोफत शिक्षण
- मैसुर येथे शकती धाम नावाचे मुलींसाठी शिक्षण व्यवस्था दिली