• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, September 15, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

घंटागाड्यांच्या इलेक्ट्रिक कन्व्हर्जनसाठी प्रिसिजन आणि महापालिका यांच्यात सामंजस्य करार

by Yes News Marathi
November 3, 2021
in मुख्य बातमी
0
घंटागाड्यांच्या  इलेक्ट्रिक कन्व्हर्जनसाठी प्रिसिजन आणि महापालिका यांच्यात सामंजस्य करार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : प्रिसिजनच्या १०० टक्के मालकीची नेदरलँड येथील सबसिडरी कंपनी “इमॉस” ही एक वैशिष्ठ्यपूर्ण व्यवसाय करते आहे. ज्यात ट्रक, बसेस आणि मिलिटरी वाहनांसाठी इलेक्ट्रिक पॉवरट्रेन्सचे डिझाईन, विकास, आणि उत्पादन करून पुरवठा करण्याचे काम केले जाते. इमॉस या कंपनीने युरोपात आजवर ६०० हुन अधिक इलेकट्रीक वाहने वितरित केली आहेत. ज्यांनी १५० दशलक्ष किलोमीटर्सपेक्षा अधिक प्रवास केला आहे.


प्रिसिजनने सदरचे तंत्रज्ञान आणि कौशल्य आता भारतात आणून यशस्वीरीत्या एक २३ आसनी संपूर्णतः रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक बस तयार केली आहे. या पहिल्याच बसच्या ड्राइव्हलाईनमध्ये जवळपास ६० टक्के भारतीय बनावटीचे उद्दिष्ट साध्य केले आहे. ARAI ने देखील याची चाचणी घेऊन प्रमाणित केली आहे.


सोलापूर महानगर पालिकेकडे संपूर्ण शहरातील कचरा एकत्रित करण्यासाठी जवळपास २५० घंटागाड्या आहेत. (लाईट कमर्शियल व्हेइकल्स) या २५० घंटागाडयांना १०० टक्के इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये रूपांतरित करण्याचा “सोमपा”चा मानस आहे.शहरातील कचरा गोळा करणाऱ्या घंटा गाड्यांचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्यासाठी सोलापूर महानगरपालिका आणि प्रिसिजन यांच्या आज रोजी सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार प्रिसिजनने वर्ष २०२२ अखेरपर्यंत तीन नवीन रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक लाईट कमर्शियल व्हेईकल व्हेइकल्स मोफत बनवून द्याव्यात. ज्याचा वापर महापालिका घंटागाड्यांसाठी करेल. या गाड्यांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी प्रिसिजनने आवश्यक ती सेवा द्यायची आहे. या तीन गाड्यांच्या यशस्वी चाचणीनंतर महापालिकेच्या ताफ्यातील घंटागाड्यांचे संपूर्णतः इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये रूपांतर करण्यासाठी महापालिका ई – टेंडरिंग प्रक्रिया पूर्ण करेल.


सोलापूर महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार या घंटागाड्यांचे रेट्रोफिटेड इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये रूपांतर झाल्यानंतर इंधनावर होणारा वार्षिक साडेसहा कोटी रुपये इतका खर्च वाचेल आणि जवळपास १८०० टन कार्बन डायऑकसाईडचे होणारे उत्सर्जन वाचेल. शिवाय, रहिवाशी क्षेत्रात होणार आवाजाचा स्तरही लक्षणीयरित्या कमी होईल.
या इलेक्ट्रिक गाड्यांसाठी आवश्यक असणारी सुविधा आणि गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हर्स आणि बाकी मनुष्यबळाला प्रशिक्षण देण्याची महापालिकेने जबाबदारी घेतली आहे.
या गाड्यांच्या विकासासाठी प्रिसिजन आणि सोलापूर महानगरपालिका यांनी एकत्रितपणे परस्पर सहकार्याने कार्य करण्याचा निश्चय केला आहे.


या करारावर स्वाक्षरी करण्याच्या प्रसंगी सोलापूर महापालिकेच्या महापौर श्रीमती श्रीकांचना यन्नम आणि महापालिकेचे आयुक्त श्री पी शिवशंकर, महापालिका सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार व अन्य अधिकारी तसेच अमोलबापू शिंदे, चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे आदी पदाधिकारी आणि प्रिसिजनच्या वतीने चेअरमन यतिन शहा, पूर्णवेळ संचालक करण शहा आदी उपस्थित होते.

Previous Post

सोलापूर शहर युवक कॉंग्रेसची निवडणूक रंगतदार होणार

Next Post

बँक ऑफ इंडियाच्या नफ्यात 99 टक्के वाढ

Next Post
बँक ऑफ इंडियाच्या नफ्यात 99 टक्के वाढ

बँक ऑफ इंडियाच्या नफ्यात 99 टक्के वाढ

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group