सोलापूर : अश्विनी सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्र नियमित, सोलापूर या संस्थेची संचालक मंडळ सदस्यांची सन २०२१-२२ ते २०२६-२७ या पंचवार्षिक कालावधीसाठीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करणेसाठी सर्वसाधारण सभा दि.०३ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता गुजरात भवन, मुरारजी पेठ, सोलापूर येथे कुंदन भोळे सा, निवडणुक निर्णय अधिकारी, अश्विनी सहकारी रुग्णालय तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सभेच्या सुरुवातीस संस्थेचे ज्येष्ठ संचालक व माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांनी सर्वे उपस्थितांचे स्वागत केले. अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित, सोलापूर या मल्टी स्टेट को-ऑपरेटीव्ह संस्थेच्या संचालक मंडळ सदस्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम कुंदन भोळे, निवडणुक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केला होता. सदर निवडणुक कार्यक्रमानुसार, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम कालावधीपर्यंत संचालक मंडळाच्या असलेल्या जागेएवढेच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले होते. त्यामुळे सदरची निवडणुक बिनविरोध झाल्याचे सभाध्यक्ष कुंदन भोळे यांनी सभेमध्ये जाहीर केले. सभाध्यक्ष कुंदन भोळे सा यांनी खालीलप्रमाणे संचालक बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले.
वैयक्तिक सभासदांचे प्रतिनिधी
- बिपीनभाई महिजीभाई पटेल
- गंगाधर सिद्रामप्पा कुचन
- चंद्रशेखर सिध्दलिगय्या स्वामी
- वेणुगोपाल बद्रीनारायण तापडीया
- संजीव जयकुमार पाटील
- भरैलाल मोहनलाल कोठारी
- जयेशभाई रमेशभाई पटेल
- मेहुल बिपीनभाई पटेल
- डी.राम रेड्डी
- यतीन सुभाष शहा
अश्विनी रुग्णालयामध्ये कार्यरत डॉक्टरांचे प्रतिनिधी
- डॉ. विजय काकासाहेब पाटील
- डॉ. सिध्देश्वर मन्मथ रुद्राक्षी
- डॉ. गुरुनाथ पुरुषोत्तम परळे
- डॉ. विद्यानंद मनोहर चव्हाण
- डॉ. अतुल अनंत कुलकर्णी
महिला प्रतिनिधी
- यशोदाबाई नंदलाल डागा
- इंदुमती परमानंद अलगोंड
अनुसूचित जाती / जमाती प्रतिनिधी
- अशोक अण्णाराव लांबतुरे
उस्मानाबाद / लातूर जिल्ह्यांमधील सभासदांचे प्रतिनिधी
- शैलेश जयंतीलाल शाह
कर्नाटक राज्यातील सभासदांचे प्रतिनिधी
- गणेश तापडीया