सोलापूर : पृथ्वीराज माने युवा मंचच्या तेलगाव व डोणगाव शाखेचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. बाळासाहेब माने, रामभाऊ हाक्के, सरपंच रेवणसिध्द पुजारी, प्रभाकर अवताडे, दिंगबर मेटे, नंदकुमार पाटील, कृष्णात चराटे, धनंजय गायकवाड, तानाजी पाटील, प्रभू पुजारी, नानासाहेब जाधव, युवा मंच अध्यक्ष सुनील जाधव, अॅड. अजित पाटील, उमेश भगत यांची प्रमुख उपस्थिती होती. एकरुख तलावातून या भागास मिळणाऱ्या कॅनालचे अस्तित्वच संपले असून देगाव जोड कालव्यातून या भागास पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन, असे आश्वासन माजी आमदार दिलीप माने यांनी दिले.
यावेळी पृथ्वीराज माने, बाळासाहेब माने, सुनील जाधव, राजाराम कोलते, पंकज गुंड, रमाकांत चराटे आदींनी मनोगत व्यक्त केले. कोरोनामध्ये काम केलेल्या पोलिस निरीक्षक सुनील मेटे, पोलिस नाईक , राहूल सुरवसे, संजय आवताडे, किसन कोलते व सर्कल सुखदेव पाटील, सोमनाथ चराटे व आशा वर्कर मनिषा हक्के यांचा कोरोनायोद्धा म्हणून साकार करण्यात आला.
याप्रसंगी जगन्नाथ रेवणसिध्द स्वामी, शिवाजी पाटील, प्रभाकर पाटील, सुदर्शन , पाटील, नवनाथ पाटील, सचिन पाटील, पाटील, नागनाथ चराटे, कृष्णात चराटे, बाबा मोहिते, विजय अवताडे, रत्नाकर पाटील, लक्ष्मण गिरी, पंडीत शेटे, आण्णा पाटील, भारत भोसले, जैनुद्दीन शेख, गणपत बचुटे, सचिन गुंड, अजय सोनटक्के, भैय्या पाटील, शहाजी भोसले, तात्या कदम, बबन जगताप, गोंविद राठोड, ज्ञानदेव भोसले, अक्षय गायकवाड, जगन्नाथ पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन युवराज मेटे यांनी केले.