सोलापूर : १०५ ते ११५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे फटाके फोडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणली आहे. अशा प्रकारच्या फटाके विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २३ गुन्हे दाखल असून, १३२ जणांकडून २१ लाख ३४ हजार रुपयांचे फटाके जप्त आहेत. ही माहिती पोलिस उपायुक्त डॉक्टर वैशाली कडूकर यांनी दिली.
सोमवारी सायंकाळी शहरातील विविध फटाके दुकानांची तपासणी करण्यात आली. यात प्रामुख्याने पार्क चौक, आसार मैदान, पश्चिम मंगळवार पेठ, कर्णिक नगर, बाळे, होडगी रोड, विजापूर रोड, राजेंद्र चौक, कन्ना चौक या परिसरात ही कारवाई करण्यात आली. सातही पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी, प्रदूषण मंडळाचे अधिकारी ही कारवाई केली. १०५ ते ११५ पेक्षा जास्त आवाज करणारे फटाके जप्त करण्यात आले आहेत. यात विशेषतः सुतळी फटाके, लक्ष्मी फटाके, माळा जप्त आहेत. ज्या फटाक्यांवर ग्रीन फटाके असे लिहिलेले आहे त्यांनाच विक्री परवानगी आहे.२०१५ साली फटाके न्यायालयाने रात्री आठ ते दहा या वेळेतच फटाके फोडावेत. तसेच १०५ ते ११५ डेसिबल फटाके फोडता येतील. याच आदेशाची अंमलबजावणी करण्यात आल्याची माहिती उपायुक्त कडूकर यांनी दिली.