मुंबई : “एनसीबीचे विभागीय संचालक तथा माझे पती समीर वानखेडे यांच्याविरोधात एक पूर्ण यंत्रणा काम करते आहे. पण मला विश्वास आहे की आरोप करणाऱ्यांच्या हाताला काहीच लागणार नाही. ते खूप प्रामाणिक ऑफिसर आहेत. मागील 15 वर्षांचा रेकॉर्ड पाहता त्यांच्यावर एकही आरोप नाही. अनेकांना त्यांच्या कामाचा त्रास होतोय. ज्यांना त्रास होतोय तीच लोकं समीर यांच्या पाठीमागे लागली आहेत”, असं समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर म्हणाल्या.
भाजपच्या सांगण्यानुसार समीर वानखेडे कारवाई करतात, त्यानुसार त्यांच्या कारवाईची दिशा ठरते, असा आरोप समीर वानखेडे यांच्यावर केला जातोय. या प्रश्नाला उत्तर देताना क्रांती रेडकर म्हणाली, “या आरोपात कोणतंही तथ्य नाही. ते कोणत्याही पक्षासाठी काम करत नाहीत, ते न्यूट्रल आहेत. ते खूप प्रामाणिक ऑफिसर आहेत.” पुढे बोलताना क्रांती म्हणाली, “राहिला प्रश्न बॉलिवूड कलाकारांवर कारवाई करण्याचा तर समीर वानखेडे फक्त कलाकारांना पकडत नाहीत, ते फक्त दोन-तीन टक्के आहेत. उरलेले ड्रग्ज पेडलर आणि त्यासंबंधी आहेत. त्यामुळे जे आरोप करतायत त्यांच्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही”