सोलापूर : हाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त पि.शिवशंकर यांच्या निर्देशानुसार मिशन युवा स्वास्थ covid-19 लसीकरण मोहीम ही दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ ते २० नोव्हेंबर २०२१ या कालावधीमध्ये शहरात राबवण्यात येणार आहे.
यामध्ये वय वर्षे अठराच्या पुढील महाविद्यालयीन विद्यार्थ्याकरिता हे लसीकरण मोहीम आयोजित केली असून या लसीकरण मोहीम मध्ये जास्तीत जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आव्हान सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी बसवराज लोहारे यांनी केली आहे. तसेच या मोहिमेची सुरुवात 25 ऑक्टोबर 2021 रोजी सोलापूर विद्यापीठ येथून सुरू करण्यात येणार आहे. सकाळी 11:00 ते सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत सदर लसीकरण आयोजित करण्यात आली असून जास्तीत जास्त अठरा वर्षांपुढील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.