येस न्युज मराठी नेटवर्क : देशात सलग पेट्रोल आणि डिझेलचे दरांमध्ये सातत्यानं होणारी वाढ सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे. भारतीय तेल वितरण कंपन्यांनी मंगळवारी 20 ऑक्टोबर 2021 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 0.35 पैशांची वाढ झाली आहे. देशाच्या राजधानीचं शहर असलेल्या दिल्लीमध्ये पेट्रोल 106.19 रुपये प्रति लिटरनं विकण्यात येत आहे. तर या दरवाढीनंतर डिझेलचे दर 94.92 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे.
मुबंईत पेट्रोल 112.11 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर डिझेलही 102.89 रुपयांनी विकलं जात आहे. मुंबईत डिझेलच्या दरांमध्ये 0.37 पैशांची वाढ झाली आहे. तर पेट्रोलच्या दरांमध्ये 0.34 पैशांची वाढ करण्यात आली आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल 103.01 रुपये प्रति लिटर विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल 106.43 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे.