मोहोळ : वाफळे (ता. मोहोळ) आणि या परिसरातील इतर गावांच्या सीना-माढा योजनेअंतर्गत शेतीच्या पाणी संदर्भात वाफळे ग्रामपंचायत कार्यालयात बैठक झाली. त्याचबरोबर जिथून पाणी आणायचे आहे, त्या जागेची पाहणी केली. आई अंबाबाईच्या यात्रेनिमित्त तिचे दर्शन घेतले.
वाफळे आणि आसपासच्या परिसरातील गावे पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे पावसाळ्यानंतर येथील शेतकर्यांना शेतीसाठी काही प्रमाणात पाण्याची चणचण भासते. हा प्रश्न मार्गी लागला तर शेतकर्यांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल. म्हणून सीना-माढा योजनेअंतर्गत शेतीच्या पाण्याचा हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करत आहोत.
यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक प्राध्यापक मा. शिवाजीराव सावंत सर, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, पंचायत समिती मोहोळ माजी उपसभापती मानाजी माने, शिवसेना माजी तालुकाप्रमुख चरणराज चवरे, शिवसेना युवा नेते प्रशांत गाढवे, अक्षय महामुनी, बिरुदेव खांडेकर, अनिल पाटोळे, यशवंत पाटील, लक्ष्मण माने, मनोहर जाधव, मच्छिंद्र चव्हाण, लक्ष्मण कृपाळ, अर्जुन कांबळे, राजेंद्र शिंदे, अर्जुन खडूळ, दत्तात्रय कृपाळ, संतोष जाधव सर, सचिन चव्हाण, श्रीराम दाडे, समस्त वाफळे गावचे ग्रामस्थ तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक उपस्थित होते.