सोलापूर : प्रिसिजन फाउंडेशनच्यावतीने यंदाच्या वर्षी 22 ते 24 ऑक्टोबर दरम्यान प्रिसिजन गप्पा हा ऑनलाइन प्रक्षेपणाचा कार्यक्रम होणार आहे. भारतीय डिजिटल पार्टी यांचा म्यूजिक कॅफे हा अभंग रीपोस्टच्या टीमचा अनोखा संगीत कार्यक्रम पहिला 22 रोजी दिवशी होईल. 23 ऑक्टोबर रोजी तुळजाई प्रतिष्ठान या संस्थेला तीन लाख रुपयांचा विशेष सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सोलापुरातील संस्था रोबिंहूड आर्मी यांना सुभाष रावजी शहा हा दोन लाख रुपयांचा स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण समारंभ होणार असून त्यानंतर रेणूताई ची मिलिंद वेरलेकर मुलाखत घेणार आहेत .शेवटच्या दिवशी 24 ऑक्टोबर रोजी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या हृदयी वसंत फुलताना हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती प्रिसिजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुहासिनी शहा व यतीन शहा यांनी दिली.