• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, August 11, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अबकी बार… चौथी बार… चेन्नई सरकार…

by Yes News Marathi
October 15, 2021
in इतर घडामोडी
0
अबकी बार… चौथी बार… चेन्नई सरकार…
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

केकेआरला मात देत चौथ्यांदा कोरलं ट्रॉफीवर नाव

येस न्युज मराठी नेटवर्क : इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल या जगप्रसिद्ध क्रिकेट लीगचं 14 वे पर्व (IPl 2021) नुकतेच पार पडले. अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपरकिंग्स हे संघ आमने-सामने होते. काही ओव्हर्स अगदी सामना चुरशीचा होईल असं वाटतं असतानाच चेन्नईच्या गोलंदाजानी दमदार कमबॅक करत सामना एकहाती जिंकला.

चेन्नईने ठेवलेल्या 193 धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी केकेआरने सुरुवात तर चांगली केली होती. सलामीवीर गिल आणि अय्यर यांनी दमदार सुरुवात केली खरी पण 91 धावांवर अय्यरची विकेट पडली आणि संघाला उतरती कळाच लागली. शार्दूलने एका षटकात अय्यर आणि राणाची विकेट घेतली आणि त्यानंतर संघातील सर्व खेळाडू एकामागोमाग एक बाद होत गेले. ज्यानंतर सामना चेन्नईने अप्रतिम गोलंदाजीच्या जीवावर 27 धावांनी जिंकला.

फाफची धमाकेदार खेळी

सामन्यात नाणेफेक जिंकत केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गनने गोलंदाजीचा निर्णय़ घेतला. ज्यामुळे चेन्नईला प्रथम फलंदाजी करावी लागली. दरम्यान आजही सीएसकेची सलामीवीरांची जोडी ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसीस यांनी संघाला उत्तम सुरुवात करुन दिली. पण 31 धावा करताच गायकवाडला सुनील नारायणने आपल्या जाळ्यात अडकवलं. पण ऋतुराज बाद झाल्यानंतरही फाफने आपली झुंज कायम ठेवली.

त्याला सोबत रॉबीन उथप्पाने साथ दिली. उथप्पाने 15 चेंडूत 3 षटकार ठोकत 31 धावा केल्या. पण सुनीलच्या फिरकीच्या जादूवर तो पायचीत झाला. ज्यानंतरही फाफने आपली खेळी सुरुच ठेवली. शेवटच्या चेंडूवर शिवमच्या बोलिंगवर फाफ बाद झाला. पण तोवर त्याने 59 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकार खेचत 86 धावा केल्या होत्या. अखेरच्या षटकात त्याला मोईन अलीने नाबाद 37 धावांची साथ दिली. त्याने 20 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकार ठोकले. अशाप्रकारे चेन्नईने महत्त्वाच्या सामन्यात केकेआरसमोर 193 धावांचे लक्ष्य ठेवले.

सीएसकेचं अप्रतिम कमबॅक

सीएसकेने ठेवलेल्या 193 धावांचा पाठलाग केकआरने अतिशय वेगात सुरु केला. दोन्ही सलामीवीर गिल आणि अय्यर यांनी अप्रतिम फलंदाजी केली. 10 षटकापर्यंत एकही विकेट गेला नव्हता. अय्यरने तर अर्धशतकही झळकावलं होतं. पण 11 व्या षटकात शार्दूने सेट फलंदाज अय्यरला (50) बाद करत पहिला झटका दिला. त्याच षटकात राणाही शून्य धावांवर बाद झाला. त्यानंतर पाहता पाहता संघाचे फलंदाज बाद होत गेले. शुभमन गिलचं (51) अर्धशतक पूर्ण झालं खरं पण तोही लगेचच बाद झाला. अखेरच्या काही षटकात मावी (20) आणि फर्ग्यूसन (18) यांनी डाव सावरायचा प्रयत्न केला. पण तोवर फाळ वेळ झाली होती. ज्यामुळे अखेर चेंडू शिल्क न राहिल्याने केकेआर 27 धावांनी पराभूत झाली. चेन्नईकडून शार्दूलने 3, जाडेजा आणि हेजलवुड यांनी प्रत्येकी 2 तर दीपक आणि ब्राव्हो यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतला.

Previous Post

…तुम मुझे कब तक रोकोगे : पंकजा मुंडे

Next Post

प्रिसिजन गप्पा मध्ये यावर्षी म्युझिक कॅफे, अशोक सराफ, रेणूताई गावस्कर

Next Post
प्रिसिजन गप्पा मध्ये यावर्षी म्युझिक कॅफे, अशोक सराफ, रेणूताई गावस्कर

प्रिसिजन गप्पा मध्ये यावर्षी म्युझिक कॅफे, अशोक सराफ, रेणूताई गावस्कर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group