• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 13, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सांगोला साखर कारखान्याचा बॉयलर अखेर पेटला..!

by Yes News Marathi
October 10, 2021
in मुख्य बातमी
0
सांगोला साखर कारखान्याचा बॉयलर अखेर पेटला..!
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

युनिट ४ सांगोला कारखान्याचा बाॅयलर अग्निप्रदिपन संपन्न

सांगोला : धाराशिव साखर कारखाना,संचलित सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना (युनिट क्र.४) काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेला सांगोला साखर कारखाना पंढरपूरचे युवा नेते अभिजीत आबा पाटील यांच्या कडे चालविण्यास असल्याने सुरू होत असून सन२०२१-२२ गळीत हंगामाचा “बाॅयलर अग्निप्रदिपन” ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली महाराज पवार, सोलापूर जिल्ह्याचे मा.आमदार दिपक आबा साळुंखे-पाटील, धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, मनसेचे नेते दिलीप धोत्रे, युवा नेते सागर पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी ह.भ.प.माऊली महाराज यांचे कीर्तन करून बाॅयलर अग्निप्रदिपन सोहळा करण्यात आला. याप्रसंगी होमहवन पूजा पळशी गावचे प्रगतीशील बागायतदार हणमंत पाटील, रतनताई पाटील व पांढरेवाडी गावचे सचिन घाटे व उर्मिलाताई घाटे या उभयतांच्या हस्ते करण्यात आला.

यंदा चांगला पाऊस झाल्याने सर्वत्र ऊसाची लागवडही मोठ्या प्रमाणात झाल्याने सांगोला,पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपास आणू अशी ग्वाही अभिजीत पाटील यांनी दिली. ब्राझील येथे दुष्काळ असल्याने आपल्या येथील साखरेस उठाव आहे. त्यामुळे साखरेला दर चांगल्याप्रकारे असल्याने शेतकऱ्यांस चांगला भाव देणे शक्य होईल अशी घोषणा चेअरमन अभिजीत पाटील यांनी केली. याप्रसंगी मा.आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील म्हणाले की तीन साखर कारखाने चालविण्याचा दांडगा अनुभव अभिजीत पाटील यांच्याकडे असल्याने कारखान्याची कामे लवकर पुर्ण केली आहेत. कारखानदारीतील डाॅक्टर म्हणून त्याच्याकडे बघितला तर वावगं ठरणार नाही. भागातील शेतकऱ्यांना, कामगारांना न्याय देण्याचं मोठे काम केले आहे. पाटील यांच्यामुळे सांगोला व येथील नागरिकांना गतवैभव प्राप्त करून दिले आहे.

याप्रसंगी धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, संचालक सुरेश सावंत, संतोष कांबळे, रणजीत भोसले, दिपक आदमिले, सुहास शिंदे, सजंय खरात, जयंत सलगर, दिनेश शिळ्ळे यासह सांगोल्याचे चेअरमन विश्वनाथ चव्हाण, संचालक अशोक शिंदे, शहाजी नलवडे, मारुती ढाळे, तुकाराम जाधव पंढरपूर भागातील जेष्ठ मंडळी, मित्र परिवार, कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

राष्ट्रवादीत सर्व रडके, ईडी, सीबीआयची कारवाई होताच रडू लागतात : निलेश राणे

Next Post

स्टाईलमंत्रा घेऊन येत आहे सोलापूरच्या शक्तिगाथा । भाग ५ । आजच्या शक्ति दुर्गा सुहासिनी शहा

Next Post
स्टाईलमंत्रा घेऊन येत आहे सोलापूरच्या शक्तिगाथा । भाग ५ । आजच्या शक्ति दुर्गा सुहासिनी शहा

स्टाईलमंत्रा घेऊन येत आहे सोलापूरच्या शक्तिगाथा । भाग ५ । आजच्या शक्ति दुर्गा सुहासिनी शहा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group