सोलापूर : महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर व त्यांच्या नातेवाईकांवर केंद्र सरकारने राजकीय द्वेष भावनेतून सूडबुद्धीने राज्यात सध्या जी कारवाई चालू आहे त्याच्या निषेधार्थ व अजित दादांना खंबीर समर्थन देण्यासाठी आज सोलापूरातील चार हुतात्मा पुतळा येथे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या सुरुवातीला शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शहरातील सर्व प्रमुख ज्येष्ठ नेते पदाधिकारी चार हुतात्मा पुतळा परिसरात एकत्र जमले होते.
निषेध आंदोलन व अजित दादांचे समर्थनार्थ अशा आशयाचा मोठा फलक यावेळी तयार करण्यात आला होता, आणि सर्व नेते पदाधिकारी यांनी हातात पक्षाचे झेंडे घेत घोषणाबाजीला सुरुवात केली. “धिक्कार असो धिक्कार असो केंद्र सरकारचा धिक्कार असो, केंद्र सरकार हमसे डरती है – इन्कम टॅक्स और इडी को आगे करती है, या केंद्र सरकारचे करायचे काय? खाली मुंडी वर पाय, चले जाव चले जाव – भाजपा शासित केंद्र सरकार चले जाव, एकच वादा अजितदादा, अजितदादा तुम आगे बढो – हम तुम्हारे साथ हैं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो” अश्या घोषणांनी परिसर दणाणून सोडताना सर्व नेते पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
ज्येष्ठ नेते जनार्दन कारमपुरी, मनोहर सपाटे, शफी इनामदार, महेश कोठे, तौफिक शेख, दिलीप कोल्हे, राजन जाधव, शंकर पाटील, कोंडी सर युवक अध्यक्ष जुबेर बागवान, महिला अध्यक्ष सुनिता रोटे, प्रांतिक सदस्य विद्या लोळगे, प्रदेश पदाधिकारी वसीम बुरहान, फारूक मटके, जावेद खैरदि, अजित बनसोडे लता फुटाणे तिन्ही विधानसभा अध्यक्ष प्रकाश जाधव, अमिर शेख तनवीर गुलजार मिलिंद गोरे बसू कोळी शिवराज विभुते विद्यार्थी अध्यक्ष निशांत सावळे सोमनाथ शिंदे महिपती पवार रुपेश भोसले आशुतोष नाटकर अजित पात्रे अजित बनसोडे गफूर शेख इरफान शेख एजाज शेख सर्फराज शेख नागेश निंबाळकर राजू कुरेशी चंद्रकांत पवार अनिल उकरंडे बाळासाहेब मोरे सागर चव्हाण किशोर चव्हाण आनंद मुस्तारे प्रमोद भोसले शामराव गांगर्डे नागनाथ मेंगाने श्रीनिवास कोंडी ज्योतिबा गुंड विजय भोईटे आशिष जेटीथोर तसेच महिला पदाधिकारी लता ढेरे, वंदना भिसे, अश्विनी भोसले, नलिनी चंदेले, लता फुटाणे, मनीषा माने, युवती पदाधिकारी शौर्या पवार आदी व इतर अनेक महिला तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आंदोलनात आपले मनोगत व्यक्त करताना शहराध्यक्ष भारत जाधव यांनी केंद्र सरकारच्या सुड बुद्धीचा निषेध करत अजितदादा व त्यांचे नातेवाईक यांच्या वर प्राप्तीकर कार्यालय कडून चालू असलेल्या कारवाईचा देखील निषेध केला.
कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी अजितदादा हे सध्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत सक्षमपणे कारभार करत आहेत हे राज्यातील भाजपा नेत्यांना रुचत नसल्याचे सांगत त्यांनी केंद्रातून राज्यातील महविकास आघाडी मधले मंत्री नेते यांना नाहक त्रास देत आहेत जे अत्यंत चीड आणणारी बाब आहे. माजी महापौर महेश कोठे यांनी देखील केंद्रातील सरकार एकीकडे महागाई वाढवत असल्याचे सांगत इंधनाचे भाव गगनाला भिडले आहेत त्याकडे दुर्लक्ष करत जाणीवपूर्वक महाराष्ट्रात अराजकता माजविण्यासाठी केंद्रातील मंत्री सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत आहेत आणि राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा आणि त्यांचे नातेवाईक यांच्या घरावर छापे टाकून आपल्याच अनागोंदी कारभाराचा प्रत्यय देत आहेत. नगरसेवक तौफिक शेख यांनी शहरातील, राज्यातील तसेच केंद्रातील भाजपा नेते, पदाधिकारी यांना इशारा देत जर असेच सरकारी यंत्रणाचा गैर वापर केला जात असेल तर ह्याही पेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू.
महिला अध्यक्ष सुनिता रोटे तसेच विद्या लोळगे, नलिनी चंदेले यांनी देखील संपूर्ण महिला आघाडी अजितदादांच्या पाठीशी बहिणीच्या नात्याने उभ्या असल्याचे सांगत राज्यात घरी बसावे लागलेल्या भाजपा आमदार आणि त्यांचे केंद्रातील डरपोक मंत्री ईडी, प्राप्तीकर खात्या मार्फत अश्या कारवाई करत आहेत पण एकीकडे महिला वर्गाचे घराचे बजेट गॅस दरवाढी मुळे कोलमडले असल्याचे ह्या निर्ढावलेले सत्ताधाऱ्यांना दिसत नाही का? त्यावर योग्य ती पाऊले न उचलता महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरत सगळ्याच बाबतीत विकास न करता देश भकास करत आहेत त्याचे काय??
अजितदादा यांच्या बहिणी ह्या राजकारणात नाहीत, त्यांच्या घरावर छापेमारी करण्याने काय साध्य होणार आहे? अशी सूड बुद्धी जर केंद्र शासन बाळगणार असेल तर राष्ट्रवादीच्या महिला ह्यापुढे रस्त्यावर उतरून ह्यापेक्षा तीव्र आंदोलन करतील. आजच्या आंदोलनाला सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते फ्रंटल व सर्व सेलचे अध्यक्ष कार्याध्यक्ष सर्व सेलचे मुख्य पदाधिकारी यांनी सक्रीय सहभाग नोंदविला.