सोलापूर,दि.4: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये 2 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2021 या कालावधीमध्ये चालणाऱ्या संपूर्ण भारत जागृती व संपर्क अभियानाची सुरुवात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्यामार्फत झाली. याबाबतची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश शशिकांत मोकाशी यांनी दिली.
रविवारी सकाळी 11.30 वाजता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व राष्ट्ररक्षक महासंघ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचेकडून पुरविल्या जाणाऱ्या मोफत विधी सेवा या विषयावर शिबीर आयोजित करण्यात होते. आपत्ती व्यवस्थापन करीत असताना येणाऱ्या अडचणी व त्यावेळी आवश्यक असलेली मदत या विषयावर ॲङ लक्ष्मण पाटील प्रकाश टाकला. आयटीआयचे प्राचार्य प्रा. सुरेंद्र शिंदे यांनी आपत्ती ही संकल्पना विषद केली.
राष्ट्ररक्षक महासंघाचे सचिव आर. बी. बटाणे यांनी आपत्ती व्यवस्थापनेचे काम करत असताना येणारे अनुभव विषद केले.
यावेळी मागील महापुरात अडकलेल्या लोकांची सुटका केल्याबद्दल अनिल सले व कमलाकर डिरे, बाधीत लोकांना जेवणाची सोय उपलब्ध करुन दिल्याबद्दल सधन शेतकरी अशोक कापसे यांचा सत्कार करण्यात आला.
मोकाशी यांनी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून दिल्या जाणाऱ्या मोफत विधी सेवा, प्राधिकरणाचे काम, लोकन्यायालय, मध्यस्थी, मनोधैर्य योजना इत्यादी विषयावर विचार व्यक्त केले. विधी सेवा मिळणेस पात्र असणाऱ्या व्यक्तीना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या कार्यालयामार्फत मोफत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. यामध्ये महिला, लहान मुले, अनुसूचित जाती जमातीमधील व्यक्ती, आपत्ती, जातीहिंसा, पूर, भूकंप, पिडीत व्यक्ती, तुरूंगात असलेले कैदी, मानवी तस्करीचे बळी ठरलेले व्यक्ती, औद्योगिक कामगार, दिव्यांग व्यक्ती व ज्यांचे उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी आहे, अशा सर्व व्यक्तींचा समावेश होतो. विधी सेवा आवश्यक असणाऱ्या व्यक्तींना याची माहिती देण्यात यावी व अशा व्यक्तीना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यापर्यंत आणावे, असे आवाहन त्यांनी केले.
उपस्थितींना कायद्याची माहिती असलेले पत्रके देण्यात आली. आभार ॲङ लक्ष्मण पाटील यांनी मानले.